शिष्यवृत्ती मिळण्यासाठी चे अटी व शर्ती

  • शिष्यवृत्ती (Scholarship) आवश्यक कागदपत्रे नोटिस प्रमाणे आवश्यक आहेत.
  • शासकीय प्रवेश – आपला प्रवेश शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) मधून झालेला असावा.
  • पालकांच्या उत्पन्नाची अट –
    • शिष्यवृत्ती (फी प्रतिपूर्ती) साठी ओ.बी.सी., एस.बी.सी, एन.टी. (OBC, SBC, NT) या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वित्तिय वर्ष 2022-23 चे उत्पन्न रु. ८.०० लाखाच्या आत असावे.
    • ईबीसी (EBC) संवर्गासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रु. २.५० लाख पर्यंत आहे तसेच ज्या पालकांचे उत्पन्न रु.२.५० लाखापेक्षा जास्त व रु. ८.०० लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यानाही ईबीसी (EBC) चा लाभ मिळू शकतो परंतु अश्या विद्यार्थ्यांना १२ वीत कमीतकमी 60 % गुण (किंवा डिप्लोमा च्या आधारे प्रवेशित विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत एकूण 50% गुण) आवश्यक आहेत.
  • शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज (Scholarship Online Application Form)शासनाने निर्धारित केलेल्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज वेळेत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रिंट आवश्यक त्या कागद पत्रासह दिलेल्या वेळेत महाविद्यालयात जमा करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील.
  • महाविद्यालयात हजेरीविद्यार्थ्याची महाविद्यालयात हजेरी किमान ७५% असणे अनिवार्य आहे.
  • विद्यापीठ परीक्षाविद्यार्थ्यांने प्रथम सत्र व व्दितीय सत्राच्या परिक्षेचा अर्ज भरणे व परीक्षा देणे अनिवार्य राहील.
  • अपत्यांची संख्याशिष्यवृत्ती सर्व संवर्गातील मुलांसाठी (male) रेशनकार्ड प्रमाणे दोन (२) अपत्यांपर्यंत मर्यादित राहील.
  • शिष्यवृत्ती साठी अपात्र विद्यार्थी -
    • विद्यार्थ्यांने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी, सन 2022-23 अगोदर इतरत्र पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम अर्धवट सोडलेला असल्यास असे विद्यार्थी; पात्र नसल्यास; (किंवा)
    • विद्यार्थ्यांने या महाविद्यालयातील अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर पुढील एकूण अभ्यासक्रमाच्या कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाल्यास; असे विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी अपात्र ठरतात
  • शिष्यवृत्ती प्रक्रिये संबधीत महत्वाचे संकेतस्थळ (वेबसाईट) – https://mahadbt.maharashtra.gov.in

Scolarship Notic

Notic 1

BCF Theme By aThemeArt - Proudly powered by WordPress.
BACK TO TOP