NES's Gangamai College of Engineering Nagaon

अटल महाआरोग्य शिबीर(16/09/2018)

अटल महा-आरोग्य शिबीर

माननीय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस साहेब व आ.ना.गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून दि. १६ सप्टेंबर, २०१८ ला धुळे येथे महा आरोग्य शिबिर संपन्न झाले. निरोगी व आरोग्यमय भारत हा देशाच्या पंतप्रधानाचा संकल्प आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्हात हे शिबीर घेण्यात आले.

माननीय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस साहेब व आ.ना.गिरीष भाऊ महाजन साहेबांचे स्वागत करतांना
आदरणीय बाळासाहेब मनोहरजी भदाणे व भा.ज.पा.जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष राम दादा भदाणे.

यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, जळगांव व धुळे येथील तज्ञ व अनुभवी डॉक्टर उपस्थित होते. या शिबिराचा लाभ सर्व गोर-गरीब जनतेला घेता यावा, यासाठी आदरणीय बाळासाहेब मनोहरजी भदाणे व भा.ज.पा.जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष राम दादा भदाणे यांनी संपूर्ण जिल्यात ५०० च्यावर वाहनांची सुविधा करून दिली होती. तसेच ही सर्व सुविधा विनामूल्य असल्याने एक लाख लोकांनी याचा लाभ घेतला.

 

Scroll to Top