कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत घेतल्या जाणाऱ्या अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय नगाव च्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात चमदार कामगिरी केली.
यात ज्यूडो या क्रीडा प्रकारात वैभव बागुल (तृतीय वर्ष मेकॅनिकल) या विद्यार्थ्यांची धुळे विभागाकडून निवड झाली.
महाविद्यालयाच्या कब्बडी संघाने अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.या संघाचे नेतृत्व समाधान पाटील या विद्यार्थ्यांने केले.या स्पर्धामध्ये महाविद्यालयाने क्रिकेट, बुद्धिबळ, योगा या क्रीडाप्रकारात सहभाग नोंदवला.

 

 

या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. ललित पाटील(क्रीडा समन्वयक), प्रा. विनोद पाटील, यांचं मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. एम. वैद्य,नगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राघवेंद्र म. भदाणे, सचिव  मनोहर द. भदाणे, उपाध्यक्ष ज्ञानज्योति म. भदाणे यांनी अभिनंदन केले.

BCF Theme By aThemeArt - Proudly powered by WordPress.
BACK TO TOP