नगाव एज्यूकेशन सोसायटी संचलीत गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात निंब,शिसम,गुलमोहर,काशिद आदि १ हजार वृक्ष लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी धुळे वनविभागाचे उपवन संरक्षक जी.के.अनारसे,नगांव एज्यूकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे,चेअरमन राम भदाणे,प्राचार्य ए.एम.वैद्य तसेच सर्व प्राध्यापक आदिच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
नगांव एज्यूकेशन सोसायटीच्या २७ एकर परिसरासाठी धुळे वनविभागाचे उपवन संरक्षक जी.के.अनारसे यांनी एक हजार झाडे लागवडीसाठी दिली यावेळी त्यांनी लागवड केलेल्या झाडाची पण पहाणी केली.तसेच यावेळी आयोजित कार्यक्रमात शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे अवाहन मनोहर भदाणे यांनी केले तर श्री.अनारसे यांनी वृक्ष लागवड व संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले.तसेच गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय व वनसंरक्षक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्य शाळा आयोजित करण्याचे देखील यावेळी निश्चित झाले. यावेळी ,नगांव एज्यूकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे,चेअरमन राम भदाणे,प्राचार्य ए.एम.वैद्य,उपप्राचार्य जी.एम.पोतदार,प्रा.आर.ओ.शेख,प्रा.डॉ.सुनिल देसले,प्रा.डॉ.के.एम.जोशी,प्रा.राहूल पाटील,विनोद पाटील,रजिस्ट्रार जे.एफ.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.